स्तुति संग्रह :: श्री हनुमन्त स्तवन स्तोत्र

श्री हनुमन्त स्तवनः

स्त्रोत्र संग्रह

श्री हनुमन्त स्तवन (कफनाशक स्तोत्र)
फणिवर उठवीला, वेग अद्भुत केला । त्रिभुवन जन लोकीं, कीर्तिचा घोष केला ॥
रघुपति उपकारें, दाटले थोर भारें । परम धिर उदारें, रक्षिलें सौख्यकारें ॥ १ ॥
सबळ दळ मिळालें, युद्ध ऊदंड झालें । कपिकटक निमालें, पाहतां येश गेलें
परदळ शरधातें, कोटिच्या कोटि प्रेतें । अभिनव रणपातें, दुःख बीभीषणातें ॥ २ ॥
कपि रिस घनदाटी, जाहली थोर दाटी । म्हणवुनि जगजेठी, धावणें चार कोटी ॥

मृत विर उठवीलें, मोकळें सिद्ध झालें । सकळ जन निवाले, धन्य सामर्थ्य चाले ॥ ३ ॥
बहुप्रिय रघुनाथा, मुख्य तूं प्राणदाता । उठविं मज अनाथा, दूर सारुनि व्यथा ॥
झडकरि भिमराया, तूं करी दृढ काया । रघुवीर भजनाया लाग वेगेसि जाया ॥ ४ ॥
तुजविण मजलागीं, पाहतां कोण आहे । म्हणवुनि मन माझें, तूझिरे वाट पाहे ॥
मज तु निरवीले पाहिजे आठवीले । सकळिक निजदासा, लागिं सांभाळविलें ॥ ५ ॥
उचित हित करावें, उद्धरावें धरावें । अनुचित न करावें, त्वां जनीं येश घ्यावें ॥
अघटित घडवावे, सेवका सोडवावे । हरिभजन घडावें दुःख ते वीघडावे ॥ ६ ॥
प्रभुवर विरराया, जाहली वज्र काया । परदळ निवटाया दैत्य कूळें कुटाया ॥
गिरिवर तुडवाया, रम्य वेशा न ठाया । तुजसि अलगडाया ठेविले मुख्य ठाया ॥ ७ ॥
बहुत सबळ साठा, मागतो अल्प वाटा । न करित हित काटा, थोर होईल ताठा ॥
कृपणपण नसावें, भव्य लोकीं दिसावें । अनुदिन करुणेचें, चिन्ह पोटीं वसावें ॥ ८ ॥
जलधर करुणेचा, अंतरामाजि राहो । तरि तुज करुणा हे, कां नये सांग पाहो ॥
कठिण ह्रदय झाले, काय कारुण्य केलें । न पवसि मज कां रे, म्यां तुझे काय नेलें ॥ ९ ॥
वडिलपण करावें, सेवकां सावरावें । अनहित न करावें, तूर्त हातीं धरावें ॥
निपटचि हठवावें, प्रार्थिला शब्द भेदें । कपि घन करुणेचा, वोळला राम तेथें ॥ १० ॥
बहुतचि करुणा ही, लोटली देवराया । सहजचि कफ गेलें, जाहली दृढ काया ॥
परमसुख विलासे, सर्वदा दासानुदासे । पवनज अनुतोषे, वंदिला सावकाशें ॥ ११ ॥
॥ इति श्रीसमर्थ रामदासकृत कफनाशक श्री हनुमन्त स्तवन संपूर्ण ॥

अनमोल विचार

शैलपुत्री (Shailputri)

शैलपुत्री

ब्रह्मचारिणी (Brahmcharini)

ब्रह्मचारिणी

चंद्रघंटा (Chandraghanta )

चंद्रघंटा

कूष्माण्डा (Kushmanda)

कूष्माण्डा

स्कन्दमाता(Sakandmata)

स्कन्दमाता

कात्यायनी (Katyayni)

कात्यायनी

कालरात्रि (Kaalratri)

कालरात्रि

महागौरी (Mahagauri)

महागौरी

सिद्धीदात्री (Sidhidatri)

सिद्धीदात्री